Tuesday, November 24, 2009

Condemn Hypocrisy-Use Your Brains

लबाड वागळे,केविलवाणा वाघ आणि शरमिन्दा महाराष्ट्र

नमस्कार,
मला आज असे लिहावे लागत आहे म्हणून फार वाईट वाटते, पण आज माझ्या पुरोगामी महाराष्ट्रात जो काही मुर्खपणा चालला आहे ते पाहता असे लिहिणे भाग आहे.
खरच आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणजे काय ? तर आपला साक्षरतेचे प्रमाण देशात उत्तम आहे, डरडोई उत्त्पन्न बऱ्यापैकी आहे, अनिष्ट रूढींना आपण फाटा दिला आहे, अंधश्रद्धेचे प्रमाण कमी आहे (सत्य साईबाबा जरी"वर्षा"वर आशीर्वादाचा वर्षाव करून जात असले तरीही ) कायदा - सुव्यवस्था चांगली आहे इत्यादी इत्यादी.
हे आपण कसे मिळवले तर यामागे ज्ञानोबा, तुकाराम महाराज ते गाडगेबाबा यासारख्या संतांची तसेच महात्मा फुले, आगरकर, कर्वे,शाहू महाराज, सानेगुरुजी, सावरकर ते बाबा आमटे यासारख्या समाजसुधारकांची मोठी भूमिका आहे,यांनी आपल्याला स्वतःच्या जीवनातून काय शिकवले? तर पवित्र धर्मग्रंथात सांगितलेल्या गोष्टीपासून ते समाजात हजारो वर्षे चालत आलेल्या परंपरा यांना
आपलीबुद्धी वापरून व विवेकाची कसोटी लाऊन जे योग्य,सत्य व पुढे नेणारं तेच स्वीकारायचे आणि जे कालबाह्य, असत्य, अयोग्य व प्रगतीला खीळ घालणारे मग ते कितीही पवित्र समजले जात असेना का टाकून द्यायचे. याच विवेकाला शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची जोड दिली सावरकर, टिळकांनी तो वाढवला आणि निर्माण झाला तेजस्वी व प्रगतीशील महाराष्ट्र !!
आणि मला सांगायला दुखः होते कि आपल्या संतांनी, समाजसुधारकांनी व महाराजांनी दिलेला विवेक आणि स्वाभिमानाचा वारसा आपण गमवत आहोत. कारण सध्या गाजत असलेल्या सचिन व बाळासाहेब, शिवसेना व निखिल वागळे प्रकरणात आपण सचिनने मुलाखतीत काय विधान केले त्याचा काय अर्थ होतो त्यावर बाळासाहेबांनी सामना मधून काय सल्ला दिला, काय टीका केली व ती आपल्याला किती समजली आहे बर यागोष्टींवर निखिल वागळे यांनी चर्चे दरम्यान बाळासाहेबांवर काय आरोप केले ते किती सुसंगत, योग्य आणि खरे होते. त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी काय मुद्दे मांडले ते कितपत तर्कसंगत व स्विकारण्या योग्य होते, हे आपण आपली स्वतःची बुद्धी व विवेक वापरूनअभ्यासले आहे का? त्यासाठी आपण सचिनची मुलाखत, दिनांक १६/११/२००९ रोजीचा सामना आणि त्याच दिवशीचा IBN लोकमत वरील "आजचा सवाल " हा चर्चात्मक कार्यक्रम किती लोकांनी प्रत्यक्ष पाहीला आहे? कि आपण कोणाकडून तरी ऐकलेल्या(अफवा) किंवा माध्यमातून विकृत करून प्रसिद्ध केलेल्या माहिती वर आधारित अपरिपक्व मत बनवून दोन्ही पक्षापैकी एकाची बाजू आंधळेपणाने घेऊन आपसातच एकमेकांना शिव्याशाप देत बसलो आहे? दोन्ही बाजूपैकी कोणीही यालाअपवाद नाही आणि यात CM पासून अनेक पत्रकार, राजकारणी, विचारवंत, बुद्धीजीवी, प्रौढ, युवक, अधिकारी आणि सामान्य माणूस सर्व सामील आहेत.त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो कि काही मत बनवण्यापूर्वीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नेमके कोणी काय विधान केले आहे याचाअभ्यासकरा.


  1. लोकशाही मुल्यांची आपल्याला चाड आहे असा दावा करणाऱ्या विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे असे आग्रहाने सांगणाऱ्या श्री निखिल वागळे यांना मी पत्र पाठवून त्यांची टीका कशी सत्याला सोडून आहे याचा उहापोह केला होता.त्याला त्यांनी जबाबच दिला नाही आणि बाळासाहेबांची आणि महाराष्ट्राची माफीही मागितली नाही. ते जर विवेकाने वागले असते तर नंतर चा राडा झाला नसता. ते पत्र मी जसेच्या तसे इथे देत आहे ते अभ्यासून सुजाण मराठी लोकांनी स्वतःच ठरवावे कि वागळे यांनी लबाडी केली आहे कि नाही?
  2. एके काळी जाच्या सत्याची पाठराखण करणाऱ्या डरकाळी ने उभा महाराष्ट्र हादरून जायचा व विरोधक आपल्या शेपट्या घालायचे. त्यांचा वारसा सांगणाऱ्यांना ज्या गोष्टीचा बुद्धीच्या व विचारांच्या योगाने विरोध करता येईल व आपल्या मुद्द्याचे समर्थन करता येईल अशी परिस्थिती असताना लाठ्या आणि काठ्यांचा वापर करावा लागतो. याचा अर्थ वाघ केविलवाणा झाला आहे असा घायचा का?
  3. IBN लोकमत आणि श्री. निखिल वागळे यांचावर शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या मुठभर लोकांनी असमर्थनीय हल्ला केला. ज्याचे आतापर्यंत शिवसेनेच्या फक्त एकमेव नेत्यानेच समर्थनकेले आहे. त्यांचा निषेध करताना काही स्वतःला विचारवंत, बुद्धीजीवी आणि मराठी म्हणवून घेणाऱ्या लोकांनी, आता आपल्याला मराठी असल्याची लाज वाटते असे रडगाणे सुरु केले आहे ते पाहता तुम्हाला काय वाटते कि महाराष्ट्र खरोखरच शरमिंदा झाला आहे का? आणि त्याने शरमिंदा होण्याची खरचं गरज आहे का?
पुढे ः- मी IBN लोकमत आणि श्री. निखिल वागळे यांना लिहलेले पत्र ज्याचे त्यांनी उत्तर देण्याची तसदिही घेतली नाही
निखिल वागळे तुम्ही माफी मागणार का?
मी तुमचा दिनांक १६/११/२००९ रोजीचा "आजचा सवाल"पाहीला. खूप राग आला आणि म्हणून तुम्हाला पत्र लिहित आहे.मी प्रथम एकगोष्ट स्पष्ट करतो कि मी कोणी शिवसैनिक नाही, नाही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता.मी एक भारतीय नागरिक आणि मराठी माणूस आहे. मी व्यक्तीपुजक नसल्याने मी त्यांना देव म्हणणार नाही परंतु कुठल्याही मराठी माणसासाठी बाळासाहेब आणि सचिन मानबिंदू आहेत.(इतरही काही आहेत) बाळासाहेबांनी सचिनवर केलीली टीका आणि राज्य पातळीवर व देशपातळीवर माध्यमांनी बाळासाहेबांवर केलेली चिखलफेक पाहिली. महाराष्ट्र द्वेषी हिंदी व इंग्रजी माध्यमांकडून व राजकीय नेत्यांकडून ती अपेक्षितच होती.इतर मराठी माध्यमांकडूनही फारशी वेगळी अपेक्षा नाही. मात्र IBN लोकमत आणि निखिल वागळे तुम्ही अभ्यासपूर्ण, निर्भय आणि निरपेक्ष पत्रकारितेसाठी ओळखले जाता. म्हणून मी तुमचा आदर करतो पण तो आज कमी झाला. इतरांनी संवादाचे शिष्टाचार पाळावेत, प्रतिक्रिया देताना किंवा वादग्रस्त मत प्रदर्शित करताना ते अभ्यासपूर्णअसावे असा तुमचा आग्रह असतो त्यानुसार तुम्ही वागलात नाही असे मला वाटते. तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते आणि म्हणूनच मला राग आला. तो तुम्हीआपल्या विवेकपूर्ण कृतीने दूर करावा.
पुढे चर्चा करण्याआधी तथाकथित वादग्रस्त विधाने पाहू
  1. सचिन म्हणाला "Mumbai belongs to India, that is how I look at it, and I am a Maharashtriyan and I am extremely proud of that but I am an Indian" यात त्याने मुंबई भारताचा एक भाग आहे व मी प्रथम भारतीय आहे नंतर महाराष्ट्रीयन असे म्हटलेले नाही.
  2. त्यावर टीका करताना बाळासाहेब म्हणतात "मात्र वार्ताहर परिषदेमध्ये 'मी मराठी व महाराष्ट्रीय असल्याचा मला सार्थ अभिमान असला तरी सर्वप्रथम मी हिंदुस्थानी आहे' हे ऐकून मराठी मने हेलावतात न हेलावताततोच पत्रकार परिषदेतील तुझ्या एक स्ट्रेट डाईव्ह ने हेलावणारे मराठी मनदुखावले. कारण तू तुझी नेहमीची खेळपट्टी सोडून राजकारणाच्या खेळपट्टीवरआलास आणि यापुढेही जाऊन बोलता झालास, "मुंबई हि कोणाची मक्तेदारी नाही. हिंदुस्थानातील सर्व लोकांचा मुंबईवर सारखाच अधिकार आहे"
  • आता सचिन ने मी आधी भारतीय आहे असे म्हटलेले नाही तुम्ही तुम्हीच दाखवलेली क्लिपिंग पुन्हा अभ्यासावी.
  • तुम्ही सामना तील वादग्रस्त लेख काळजीपूर्वक वाचलात का? (गोडबोले, आव्हाड, लेले आणि शिवसेनेचे प्रतिनिधी सरनाईक यांनी तरी वाचला होता का?)
  • वरील प्रश्नाचं उत्तर होय असेलतर तुम्हाला मराठी भाषा व्यवस्थित समजते का? कारण मी सर्वप्रथम हिंदुस्थानी आहे हे ऐकून मराठी मने हेलावली असे बाळासाहेब म्हणतात. मन हेलावणे याचा अर्थ यासंर्दभात मन अभिमानाने किंवा आनंदाने भरून येणे असा होतो असे म्या पामरास वाटते तो जर तुमच्या मताप्रमाणे योग्य असेल तर बाळासाहेबांचा प्रथम भारतीय असण्याला व तसे अभिमानाने सांगण्याला काहीचविरोध नव्हता, नाही आणि भविष्यातही नसेल. उलट त्यांना अभिमानच वाटतोत्यांनी याच लेखाच्या शेवटी लिहिले आहे "जय हिंद, जय महाराष्ट्र! " आणि हीच बाळासाहेबांची आणि तमाम मराठी माणसांची भूमिका होती आणि राज्यातील, केंद्रातील व परराज्यातील नेत्यांनी त्याबरोबर माध्यमांनी महाराष्ट्राचा व मराठी माणसांचा कितीही द्वेष केला, अपमान केला तरीहीराहील.
  • वरील मुद्दा जर तुमच्या विवेक बुद्धीला पटला आणि ते मान्य करण्याची हिम्मत केलीत तर चर्चेतील मुख्य वादग्रस्त मुद्दा 'आधी मराठी कि आधीभारतीय' ज्यावरून तुम्ही बाळासाहेबांवर टीका केलीत तो अस्तित्वातच नव्हता आणि तुमची चर्चाच फोल होती हे तुम्हाला मान्य करावे लागेल.
  • आणखी एक गोष्ट मला समजत नाही तुम्ही थोर, विद्वान आणि मान्यवर लोक दुसऱ्यांची विधाने, उदगार यामध्ये आपले शब्द का घालता हीच गोष्ट बाळासाहेबांनी सुद्धा केली आहे. लाल रंगातील शब्द हे सचिनने उच्चारलेनव्हते/नसावेत आणि तो उच्चारणार नाही (मी सचिनची पूर्ण मुलाखत पाहिलेलीनाही फक्त तुमची क्लीप पाहिली आहे) जर मी चुकत असेन तर माफ करावे व माझा गैरसमज दूर करावा.
आता जरा सचिन विषयी बोलू सचिन हा क्रिकेट विश्वातील महासूर्य आहे.त्याच्या खेळावर टीका करण्याचा अधिकार व योग्यता असणारे पृथ्वीवर कोणी जिवंत असतील कि नाही हे मला माहित नाही, असतील तर नक्कीच हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतील. तरीही गल्लीत क्रिकेट खेळणारे याबरोबर कधीही bat लास्पर्श न केलेले लोक सुद्धा त्याच्यावर टीका करतात असो. तोहि कधी कोणाला प्रत्युत्तर करत नाही त्याच्या इतका जमिनीवर पाय असणारा विरळाच.सामाजिक जीवनात आणि खेळात तो नेहमी राजकारणापासून दूर राहिला आहे. रूढार्थाने त्याचे फारसे शिक्षण झालेले नाही.त्याचा इतिहासाचा फारसा अभ्यास नसावा,संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती त्यात किती हुतात्मे झाले ते सुद्धा स्वकीयाच्या गोळ्या खाऊन याची त्याला फारशी माहिती नसावी ती माहित करून घेण्याची त्याला गरजचच नाही.त्याबद्दल त्याला दोष देण्यात काही अर्थनाही कारण तो आपल्या क्षेत्रात मास्टर आहे.
तुकाराम महाराजांनी म्हटले आहे कि उपदेश करणाऱ्याला तो देण्याचा अधिकार असावा लागतो व तो ज्याला करायचा त्याची लायकी असावी लागते. सचिनकडे राजकीय भाष्य करण्याचा अधिकार नाही यावर दुमत असूच शकत नाही. आता तुम्ही म्हणाल कि सामान्य नागरिक म्हणून तो बोलू शकतो कि नाही. कारण टपरीवर उभे राहून कोणीही येरा गबाळा गल्लीपासून दिल्लीच्या राजकारणावर मतप्रदर्शन करतोच कि नाही. महान सचिन का अपवाद. तर याचे उत्तरअसे आहे कि सचिन, लतादीदी, अमिताभ, A. P. J. अब्दुल कलाम यासारखी फारचथोडी आभाळाला भिडलेली माणसे आहेत, त्यांच्या क्षेत्रात त्यांची कोणीबरोबरी करू शकत नाहीत.याचा अर्थ त्यांना इतर क्षेत्रात अधिकारवाणीने बोलण्याचा अधिकार मिळतो असे नाही. असे असले तरी त्यांच्या शब्दांना,मतांना एक वजन आहे त्यामुळे त्यांच्या भाबड्या मतप्रदर्शनामुळे देशात वाद होऊ शकतात हे आज व यापूर्वीहीआपण पाहीले आहे.आणि आज एक मराठी दुसऱ्या मराठी माणसाशी भांडत आहे,धमक्या देत आहे तेंव्हा दुसऱ्याची बाजू घेऊन महाराष्ट्र विरुद्ध भारत असा सामना रंगवण्याचा काही नेत्यांचा आणि माध्यमांचा डाव होता तो तुम्ही ओळखला नाही आणि तो उधळून लावण्याऐवजीतुम्ही त्यात सामील झालात हे पाहून वाईट वाटते

  1. तुम्ही म्हणता कि शिवसेनेनं सचिनच्या या वक्तव्यालाराजकीय रंग देत विनाकारण त्याला या वादात ओढलं. पण मी विचारतो राजकारणापासून नेहमीच अलिप्त राहिलेल्या सचिनला त्याच्या कारकिर्दीला वीसवर्ष झालीम्हणून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीत "मुंबईकोणाची ?" असा राजकारणाने बरबटलेला प्रश्न विचारण्यामागचा त्या तथाकथितपत्रकाराचा काय उद्देश होता,काय गरज होती याचा तुम्ही विचार केला होता काय?
  2. सचिन कुठे चुकला? :- तर आपल्याला प्रश्न विचारण्यामागे पत्रकाराची विघ्नसंतोषी भूमिका आहे हे ओळखून त्याचे तोंड बंद करणारा हजरजबाब न देता "Mumbai belongs to India" असे तुमच्या भाषेत साधेसरळ उत्तर देण्याचा भाबडेपणा त्याने दाखवला व मराठीमाणूस आपल्याच माणसाचे पाय ओढतो हि परंपरा पुढे चालवली हि त्याचीचूक होती. तर त्याच्यावर टीका करायची नाही, त्याला त्याची चूक दाखूनद्यायची नाही कारण तो महान सचिन आहे अशी तुमची भूमिका कितपत योग्य आहे?
  3. आता "मुंबई कोणाची ?" या प्रश्नाकडे पाहू. मुळात हा प्रश्नच अतार्किक, असंयुक्तिक इंग्रजीत बोलायचे झालेतर.irrational, unreasonable, illogical, groundless, baseless, unfounded, unjustifiable; absurd, ridiculous, ludicrous, silly, foolish, senseless. असा प्रश्न आहे. आपण एक उदाहरण घेऊ "काश्मीर कोणाचे?" हा प्रश्न जर तुम्ही भारतात विचारलात तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळतील; काहीभाबडेपणाने भारताचे असे म्हणतील, काही तुम्हाला असे विचारल्याबद्दल मुर्खातकाढतील ,काही तुमचे दात पाडतील डोके फोडतील काही तुम्हाला देशद्रोही ठरवतील आणि जेंव्हा काही अत्यंत भाबडे भारतीय भेटतील व सांगतील कि काश्मीर पाकिस्तानचे आहे तेंव्हा तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका. असो तर काश्मीर कोणाचे ? कितीही चुकीचा वाटला तरी तो rational and logicalप्रश्न आहे कारण काश्मीर वादग्रस्त आहे हि वस्तुस्थिती आहे आणि त्यावर अधिकार सांगणारी भारत आणि पाकिस्तान काहींना मान्य नसले तरी शत्रूराष्ट्रे आहेत. पुन्हा वाचा भारत व पाक हे दोन वेगवेगळे देश आहेत. पुन्हा मूळ प्रश्नाकडे वळू याची दोन संभावित उत्तरे आहेत १)महाराष्ट्राची २) भारताची आता मला सांगा तुमच्या माहितीत हे दोन वेगळे देश आहेत का? जर असतील तर ज्या महाराष्ट्रात रहाणाऱ्या लोकांचे उत्तर मुंबई भारताची असे असेल त्यांनी महाराष्ट्रासोडून चालते व्हावे महाराष्ट्रास त्यांच्या सेवेची गरज नाही. जर महाराष्ट्र आणि भारत वेगळे देश नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर या प्रश्नातील मूर्खपणा, फोलपणा तुमच्या लक्षात येईल आणि तरीही असा प्रश्न उपस्थित करून भारत विरुद्ध महाराष्ट्र अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना वर बाळासाहेब दुसरे जिना आहेत अशी बेताल देशविघातक बडबड करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याऐवजी तुम्ही महात्मा गांधी म्हणणार आहात का?
  4. यांना मुंबईचाच पुळका का येतो? कारण सोपे आहे मुंबईत यांचे राजकीय व आर्थिक हितसंबध जोडलेले आहेत.जिथे माणसे जनावरांपेक्षा वाईट अवस्थेत जगत आहेत अर्धनग्न फिरत आहेत उपाशी झोपतआहेत औषधावाचून तडफडून मरत आहेत जिथे नक्षली आतंक माजवत आहेत असे गडचिरोली सारखे भाग भारताचे आहेत असे म्हणून त्यांच्या समस्या आपल्या समजून सोडवण्याचा प्रयत्न हे तथाकथित National integration वाले, स्वतःला intellectuals व पुरोगामी समजणारे तसेच उत्तरप्रदेश आणि बिहारचे भाग्यविधाते का करीत नाहीत? गेलीसाठ वर्ष आम्ही मराठी आहोत आम्हाला आमच्या भाषेत व्यवहार करायचेस्वातंत्र्य हवे असे म्हणत कर्नाटक सरकारच्या अत्याचारांना तोंड देणाऱ्याबेळगाव सह सीमावर्ती गावांना तीही भारताची आहेत असे समजून त्यांच्यावरीलअन्याय दूर करण्याचा प्रयत्न करणे, कर्नाटक सरकारला राष्ट्रीय एकतेचे डोसपाजणे व जाब विचारणे अशी कामे हे लोक का करत नाहीत?

  5. असे प्रश्न IBN लोकमतच्या माध्यमातून उचलून धरण्याऐवजी "टीकाजरी सौम्य असली तरी बाळासाहेब टीका करताना कसलाही विचार करत नाहीत. मनसेवर कुरघोडी करण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेबांचा वापर केला आहे. तसंचसचिनवर केलेली टीका म्हणजे थिल्लरपणा आहे"."सचिनवर टीका म्हणजे सूर्यावरथुंकण्यासारखे आहे" 'पोल जरी बाळासाहेबांच्या बाजूने असला तरी सुजाणप्रेक्षक सचिनच्या बाजूने आहेत" असे म्हणून बाळासाहेब सचिनचे शत्रू आहेतअशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे " सचिन चुकला नाही,बाळासाहेबच चुकीचे आहेत त्यांनी माफी मागावी " अशी मागणी करणे अशी अपेक्षानिदान तुमच्याकडून नव्हती निखिल वागळे साहेब !! म्हणून मला तुमचा राग आलाआहे .
तरी सर्वप्रकरणाचापुन्हा अभ्यास करून आपल्या सदसद्विवेकबुद्धीला साक्ष ठेऊन विचारा खरच कोणचुकले आहे? सचिन, बाळासाहेब कि निखिल वागळे आणि जर उत्तर निखिल वागळेअसेल तर जशी तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवता त्याप्रमाणे----

निखिल वागळे तुम्ही माफी मागणार का?


ता. क. वरील पत्र माननीय बाळासाहेबांची पाठराखण, समर्थन किंवासंरक्षण करण्याहेतुने लिहलेले नाही तशी माझी योग्यता नाही. त्यांना गरजहीनाही याचीकृपया नोंद घ्यावी
"जय हिंद, जय महाराष्ट्र"

इथे वरील पत्राला उत्तर न मिळाल्यामुळे या पत्राचा दुसरा भाग लोकमत ला पाठवला नाही. तो पुढे लिहित आहे.

निखील वागळे तुम्ही माफी मागणार का? भाग 2
नमस्कार,
माझे आधीचे पत्र तुम्ही वाचले असेल अशी आशा करतो.
त्यात काही मुद्दे मांडायचे राहिले होते. ते असे
  1. कालचे तुमचे तज्ञ अच्च्युत? गोडबोले फार विद्वान गृहस्थ आहेत त्यांच्या बद्दल मला खूप मनापासून आदर वाटतो. त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला कि मीसर्वप्रथम विश्वाचा नागरिक आहे. नंतर पृथ्वीचा मग भारताचा नंतर महाराष्ट्राचा तदनंतर जिल्ह्याचा शेवटी तालुक्याचा इत्यादी इत्यादी.ऐकायला हे तत्वज्ञान खूप छान आहे.पण खरच किती लोकांची ते अमलात आणण्याएवढी मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक तयारी झाली आहे असे तुम्हाला वाटते? खरच हि गोष्ट pragmatic आहेका? आपण राज्य पातळीवर विचार करू महाराष्ट्रात ३० टक्क्यांपेक्षा जास्तलोक दारिद्र्य रेषेच्या खाली जगत आहेत. त्यांच्या कडे अंग झाकण्या पुरतेकपडे नाहीत.दोन वेळ पोटाची खळगी भरता येत नाही अश्या लोकांसाठी विश्वनागारीकात्वाचा दावा करणाऱ्या गोडबोले साहेबांनी किती वेळा आपल्या कपड्याचा त्याग केला आहे, कितीवेळा स्वतःच्या व कुटुंबियाच्या तोंडातीलघास काढून त्यांना भरवला आहे. गांधीची पूजा करणे, गांधीवादावर लंब्याचौड्या गप्पा मारणे हि खूप सोपी गोष्ट आहे पण गांधींसारखे जीवन जगणे जवळ जवळ अशक्य.म्हणून गांधी शतकातून नव्हे तर सहस्त्रकातून एकदाच जन्म घेतात. सत्य हेच आहे कि बहुतेक जण आपला, आपल्या कुटुंबाचा विचार सर्वप्रथम करतात नंतर बाकी सगळे आणि त्यात काही गैर नाही. तरpractical गोष्ट अशी कि सर्वप्रथम मी आणि माझे कुटुंबीय सुखी व्हावेत वत्यासाठी मी स्वतः प्रयत्न करावेत मग शेजारी, मित्र, समाज, जिल्हा, राज्यमग देश शेवटी जग सुखी करावे. या वरवर स्वार्थी वाटणाऱ्या भूमिकेतूनच आपणविश्वनागरिकत्वाकडे जाऊ शकू. पोकळ तत्वज्ञानातून नाही.
  2. दुसरे विद्वान जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्याबद्दल काही बोलण्यासारखे नाही.ते कॉमेंट्री फार छान करतात मला वाटते राजकारणापेक्षा त्यांना त्या क्षेत्रात खूप चांगले भविष्य आहे.
  3. वागळे तुमचे मला एक पटते कि माणूसजेंव्हा बुद्धिबळात कमी पडतो तेंव्हा तो बाहुबळ वापरतो.हिच शिवसेनेची खरीसमस्या राहिली आहे.वैचारिक पातळीवर लढून युद्ध जिंकण्याचा त्यांनी कधीचप्रयत्न केलेला नाही. बाळासाहेबांनी एखादी भूमिका घेतली कि तीकाळ्या दगडावरची रेष मग तिचे योग्यायोग्यापलीकडे जाऊन समर्थन करण्याचाकेविलवाणाआणि दुराग्रही प्रयत्न करणे हीच त्याची भूमिका! आणि गम्मतम्हणजे ९९ टक्क्यांपेक्षा जास्तवेळा बाळासाहेबांची भूमिका योग्य असूनहि शिवसैनिकांना तिचे मुत्सद्दीपणे समर्थन करून विरोधकांचे तोंड बंद करणे वती भूमिका त्यांना मान्य करावयाला लावणे जमत नाही. तर अयोग्य भूमिकेचीबातच सोडा. या पार्श्वभूमीवर सरनाईक साहेबाच्या सफाईवर मी टिप्पणी करणे मूर्खपणाचे ठरेल. (राऊत आणि देसाई याला अपवाद नाहीत) अश्याप्रकारे बाळासाहेब हिटविकेट झाले नसून त्यांना शिवसैनिकांनी run-out केले आहे.
  4. सुनंदन लेले हे फारच उत्तम सदगृहस्थ आहेत. त्यांनी एक चर्चेच्या संदर्भात अयोग्य तरीही फार logical मुद्दामांडला, मी त्यांचा आभारी आहे. ते म्हणाले मी जर M .Com झालो आहे तरकोणी तू आधी B.Com. झाला आहेस असे अभिमानाने सागितले पाहिजे असा दुराग्रह धरला तर तो मूर्खपणा ठरेल. कारण M.Com. झालेला B.Com. असतोच ते गृहीतच आहे आणि पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही. याच तर्काचा वापर करून आपणम्हणू शकतो कि "मुंबईहि महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र हा भारताचा अविभाज्य घटक(राज्य) आहे " दुसऱ्या शब्दात "मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्र भारताचा आहे " आणि हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ/सत्य आहेयाबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मग मुंबई भारताची आहे हे नव्याने सांगणेम्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. त्यायोगे "मुंबई कोणाची?" असा प्रश्नविचारणे व त्यावर चर्चा करणे अडाणीपणाचे द्योतक आहे. तरीही कोणी वाईटहेतूने हा प्रश्न उपस्थित करत असेल तर त्याला तिथल्यातिथे खरमरीत उत्तरदेऊन गप्प केले पाहिजे ज्यायोगे तो पुन्हा महाराष्ट्राच्या वाट्याला जायचाखोडसाळपणा करण्याची हिम्मत करणार नाही. सचिनने असे उत्तर दिले नाही एवढीच चूक त्याच्या कडून झाली आहे असे मला वाटते.
सारांश
  • मला मराठी असल्याचा प्रचंड अभिमान असलातरीही मी भारतीय आहे असे बोलून सचिनने काहीही चूक केलेली नाही.
  • बाळासाहेबांनी आधी मराठी कि आधी भारतीय यामुद्द्यावरून सचिनवर टीका केलेली नाही उलट समर्थन केले आहे.
  • बाळासाहेबांनी "मुंबई हि कोणाची मक्तेदारी नाही. हिंदुस्थानातील सर्व लोकांचा मुंबईवर सारखाच अधिकार आहे." या सचिनच्या विधानावर टीका केलेली आहे जे विधान माझ्या माहितीप्रमाणे सचिनने कधीच केलेले नाही हि बाळासाहेबांची चूक आहे.
  • "मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्र भारताचा आहे आणि या गोष्टीची पुन्हा पुन्हा वाच्यता करण्याची मला गरज वाटत नाही" असे उत्तर सचिनने दिले नाही हि त्याची चूक आहे.
  • शेवटी वस्तुस्थिती जाणून नघेता, कुठलाही पूर्वाभ्यास न करता, सत्याचा विपर्यास करीत अस्तित्वातनसलेल्या मुद्द्यावरून बाळासाहेबांवर टीका करण्याचा थिल्लरपणा केलात हितुमची चूक आहे निखिल वागळे.
  • तुम्ही निष्पक्ष,निर्भय,निर्भीड, लोकप्रश्नांची जाण व ते सोडवण्याची तळमळ असणारे,प्रामाणिक, सुसंस्कृत,विवेकी असे पत्रकार आहात जे आजकाल दुर्मिळ आहेत अशीमाझी समजूत आहे ती योग्य कि अयोग्य असा संशय माझ्यामनात निर्माण झालाआहे.मला माहित नाही कि बाळासाहेब आणि सचिन आपली चूक सुधारू शकतात का? पणतुम्ही आपली चूक सुधारून माझ्या मनात तुमच्या बद्दल निर्माण झालेला संशयहि माझी चूक होती असे समजून ती सुधारण्याची मला संधी द्यावी हि विनंती.
शेवटी सचिनच्या कारकिर्दीला २० वर्षे झाली म्हणून त्याचे अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
सचिन तू असाच तळपत राहा
"जयहिंद, जय महाराष्ट्र
!"


No comments:

Post a Comment

Followers